
दिग्गज क्रिकेटपटू, मुंबई संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंग रेगे यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेगे यांच्या निधनाने मुंबई क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. मुंबई क्रिकेट संघनेत मिलिंद रेगे यांनी निवड समिती सदस्य, मार्गदर्शकासह अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. रेगे यांनी 1967/68 ते 1977/78 या काळात मुंबई क्रिकेट संघातून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे ते अध्यक्षही होते.