वेताळेश्वराची मूर्ती चोरली, चोरांनी देवालाही सोडले नाही

चोरट्यांनी कल्याण तालुक्यातील खोणी गावात वेताळेश्वराची दगडी मूर्ती आणि दोन समया लांबवल्याचे उघडकीस आले असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

खोणी गावातील शेतकरी मोतीराम जुमारे यांच्या पूर्वजांनी उपासनेसाठी शेतात वेताळेश्वराची स्थापना केली. मात्र चोरट्यांनी ही मूर्ती आणि दोन पितळी समया घेऊन पोबारा केला. मूर्तीचा शोध न लागल्याने हतबल झालेल्या जुमारे यांनी चोरट्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.