
सोलापूरचा वेताळ शेळके यंदाच्या 66व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. ‘महाराष्ट्र केसरी’च्या कीताबी लढतीत वेताळ शेळकेने 1- 7 च्या फरकाने पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. कर्जत येथील श्री संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत ही स्पर्धा रंगली होती. आमदार रोहित पवार यांच्यावर या स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी होती. या स्पर्धेत पृथ्वीराज पाटील हा उपमहाराष्ट्र केसरी ठरला. विजेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते चांदीची गदा आणि बुलेट गादी बक्षीस म्हणून देण्यात आली.