
चंद्रपूर शहरात असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या खांबांवर लावण्यात आलेले व्हर्टिकल गार्डन ओसाड पडले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेल्या या गार्डन मधील झाडे चोरीला गेल्याने ते केवळ नावाला गार्डन उरले आहे.
शहराच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेतर्फे हे व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले. दोन खांबांवर त्यासाठी निवडून झाडे लावण्यात आली. महिनाभर त्याची निगा राखली गेली. मात्र त्यानंतर दुर्लक्ष झाले. झाडांना नियमित पाणी मिळेनासे झाले. त्यामुळे झाडे सुकायला लागली. अशातच चोरट्यांनी यातील रोपे लांबवायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता हे फुललेले गार्डन ओसाड झाले. लाखोंचा खर्च वाया गेला. पैशांची ही उधळपट्टी दिसताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.