फेसबुक-इन्स्टाग्रामवर व्यवसाय करणे आता सोपे, ‘मेटा’कडून व्हेरीफाईड प्लॅनची घोषणा

facebook-instagram-meta-fb-insta

अनेकजण फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्यवसाय चालवत असतात. मात्र, आता व्यावसायिकांसाठी फेसबुककडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱयांना मोठा फायदा होणार आहे. व्यावसायिकांना प्रामुख्याने मेटाकडून व्यवसायवृद्धीसाठी अधिक सुविधा पुरवल्या जाणार आहे. त्यासाठी मेटाकडून व्यावसायिकांसाठी सबस्क्रिप्शन प्लॅनदेखील लाँच करण्यात आले आहे. मेटाचे हे प्लॅन ग्राहकांना 639 रुपये ते 21,000 रुपये मासिक या दराने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानात फेसबुकच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करणाऱयांना आपल्या व्यवसायासाठी व्हेरीफाईड प्लॅन उपलब्ध होणार आहे.

व्हेरीफाईड असल्यास ग्राहकांचा विश्वास

नवीन मेटा वेरिफाय सब्सक्रिप्शन प्लॅनमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर बिझनेस अकाऊंट वेरिफाय करण्याची सुविधा देईल. वेरिफिकेशनंतर बिझनेस प्रोफाईलवर ब्लू टिक (ब्लू बॅज) मिळेल. त्यामुळे लोकांना तुमच्या शॉप किंवा बिझनेस अकाऊंटची सत्यता समजेल.

व्यवसायानुसार प्लॅन

सध्याच्या घडीला मेटाचे हे सबस्क्रिप्शन प्लॅन फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअॅपवर आयओएस या अँड्रॉइडच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही मेटाचे हे बंडल सबस्क्रिप्शनदेखील घेतले जाऊ शकतात. विशेष म्हणजे मेटाने हे प्लॅन खरेदी करण्यासाठी व्यावसायिकांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

व्हेरीफाईडचे 4 प्लॅन

मेटाने मागील वर्षी बिझनेससाठी मेटा व्हेरीफाईडची सुरुवात केली होती. या पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून मेटा कंपनीला जाणून घ्यायचे होते की, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्यावसायिक कशा पद्धतीने व्यवसायामध्ये वाढ करू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन कंपनीने चालू वर्षाच्या सुरुवातीला चार नवीन मेटा व्हेरीफाईड प्लॅनची घोषणा केली होती. या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अकाउंट सपोर्टसह बिझनेससाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.