तुर्कस्तान आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत चाललाय. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी इस्रायलविरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. मात्र तुर्कीच्या धमकीचा इस्रायलवर काहीही परिणाम झालेला नसून, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची अवस्था नक्कीच सद्दाम हुसेनसारखी होईल अशी धमकी इस्रायलने दिली आहे.
इस्रायल हमास संघर्ष सुरू असतानाच, हिजबुल्लाहनंतर तुर्कीने इस्रायलविरोधात आघाडी उघडण्याचे संकेत दिले आहेत. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी रविवारी म्हटलं की, तुर्पस्तान इस्रायलमध्ये घुसू शकतं.
याआधीदेखील अशा मोहिमा तुर्की सैन्याने केल्या असल्याचे एर्दोगन यांनी सांगितले. इस्रायलला उकसवण्यासाठी तुकाaचे राष्ट्रपती एर्दोगन यांची वक्तव्ये येत आहेत. एर्दोगन यांनी हमासवर आक्रमण केल्यापासूनच इस्रायलवर कायमच सडपून टीका केली आहे. मात्र तुर्पस्तानने नेमपं कोणत्या पद्धतीने हस्तक्षेप करणार याचा खुलासा केलेला नाही. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्झ यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय की, इस्रायलला धमकी देऊन एर्दोगन हे सद्दाम हुसेनचाच मार्ग स्वीकारत आहेत. मात्र सद्दाम हुसेन यांचे काय झाले याची माहिती एर्दोगन यांनी घेणे आवश्यक आहे.
– इस्रायलवर हिजबुल्लाहने केलेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला आहे. तुर्पस्तान हा नाटोचा सदस्य आहे. इस्रायल-हमास युद्धावरून नाटो देशांमध्ये मतभेद आहेत. नाटोच्या काही देशांनी इस्रायलला तर तुकाaसारख्या देशांनी हमासला पाठिंबा दिलाय.