ट्रेनमध्ये विषारी साप घुसल्याने प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली. गरीब रथ एक्सप्रेसमध्ये हा साप प्रवाशांना दिसला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये एक विषारी साप दिसला. एक्सप्रेसच्या कोच जी 3 सीट क्रमांक 23 च्यावर हा साप दिसला. हा साप दिसल्यानंतर प्रवाशी घाबरूनच गेले. हा साप वरच्या दिशेने बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला बाहेर पडायला जागाच नाही मिळाली. कसारा रेल्वे स्टेशनजवळ आल्यावर एका प्रवाशाला हा साप दिसला. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती दिली. तेव्हा रेल्वेने या प्रवाशांना दुसऱ्या कोचमध्ये हलवलं.
Snake in train! Snake in AC G17 coach of 12187 Jabalpur-Mumbai Garib Rath Express train. Passengers sent to another coach and G17 locked. pic.twitter.com/VYrtDNgIIY
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) September 22, 2024