![education](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/education-1-696x447.jpg)
गेवराई तालुक्यातील सेलू येथील शेतकरी कुटुंबातील शिवराज अशोक शिंगाडे याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले आहे. शिवराजचे वडील अल्पभूधारक शेतकरी, भाजीविक्रेते. वडिलांचे आयुष्यभराचे कष्ट लक्षात घेता शिवराजने दररोज 10-10 तास अभ्यास करून कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंटंटचे शिक्षण घेतले.
80-90 च्या दशकात कोरडवाहू असलेल्या सेलू गावातील शेतशिवार जवळपास 75 टक्के ओलिताखाली आले. यामुळे शेतकरी नगदी पिकाकडे वळला. शेतकरी अशोक शिंगाडे यांनी आपल्या तीन एकर जमिनीवर भाजीपाला लागवड करून मुलगा शिवराजचे शिक्षण पूर्ण केले. शिवराजने जिद्द आणि चिकाटीचे दर्शन घडवत उच्च शिक्षण घेतले. छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर पुणे येथे कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंटंटचे शिक्षण घेण्यास पात्र ठरला. भाजी विक्रेत्याच्या मुलाचे आज पंचक्रोशीत कौतुक होत आहे.