
देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंची भरमसाट वाढ झाली आहे. देशात शाकाहारी थाळीची किंमत जूनमध्ये 10 टक्के (वार्षिक आधारावर) वाढून 29.40 रुपये झाली आहे. गेल्या वर्षी जून 2023 मध्ये व्हेज थाळीची किंमत 26.7 रुपये होती. सीआरआयएसआयएलने शुक्रवारी जारी केलेल्या फूड प्लेट किमतीच्या मासिक निर्देशांकामध्ये ही माहिती दिली. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत 5.75 टक्के वाढ झाली आहे. मे महिन्यात व्हेज थाळीची किंमत 27.80 रुपये होती. तर मे 2023 मध्ये व्हेज थाळीची किंमत 25.50 रुपये होती, असे क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटले आहे. टोमॅटो, बटाटा आणि कांदा 46 टक्केच्या किमती वार्षिक आधारावर वाढल्यामुळे किमतीत वाढल्या.
मांसाहारी थाळीही महाग
मांसाहारी थाळीची किंमत जूनमध्ये वार्षिक आधारावर 4 टक्क्यांनी कमी होऊन 58.30 रुपये झाली आहे. गेल्या वर्षी जून 2023 मध्ये मांसाहारी थाळीची किंमत 60.50 रुपये होती. परंतु, मेच्या तुलनेत जूनमध्ये मांसाहारी थाळीच्या किंमतीत 4.29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मेमध्ये मांसाहारी थाळीची किंमत 55.90 रुपये होती. तर मे 2023 मध्ये मासांहारी थाळीची किंमत 59.90 रुपये होती.
तांदूळ 13 टक्के आणि डाळींच्या किंमतीतही 22 टक्क्यांची वार्षिक आधारावर वाढ झाल्याचे क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटलेय.