![Veermata Jijabai BhosaleUdyan and Zoo](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/12/Veermata-Jijabai-BhosaleUdyan-and-Zoo-696x447.jpg)
मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील सर्व पशु-पक्ष्यांच्या निवासस्थानापासून वनस्पतींच्या नावासह तिची वैशिष्ट्ये एका अॅपवर समजणार आहेत. याबाबत आज ‘मुंबई बोटॅनिकल गार्डन अँड झू अॅप’चे लोकार्पण फोर्ट येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. उद्यान व प्राणी संग्रहालयात शेकडो प्रकारचे पशू-पक्षी, वनस्पती आहेत. या वनस्पतींची माहिती या ठिकाणी येणारे पर्यटक आणि मुंबईकरांना व्हावी यासाठी सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशन आणि नगर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या लोकार्पणप्रसंगी माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर, फिरोज गोदरेज आणि उद्यान संचालक डॉ. संजय त्रिपाठी आदी उपस्थित होते.