अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. वीर पहाडिया याचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असून यात तो टी. विजया उर्फ टोडीची भूमिका साकारत आहे. स्क्वाड्रन लीडर अज्जमदा बोप्पाया देवय्या यांच्या जीवनावर आधारित ही भूमिका आहे. 1965 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात गाजवलेल्या शौर्यापद्दल देवय्या यांना महावीर चक्र देऊन गौरविण्यात आले होते.
‘स्काय फोर्स’ चित्रपटात वीर पडाहिया याने साकारलेल्या भूमिकेचे चित्रपट समिक्षकांनी तोंड भरून कौतुक केले आहे. पहाडियाचे पदार्पण ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातील हृतिक रोशन सारखे अभूतपूर्व आहे, असे एका युजरने म्हटले आहे. तर काहींनी त्याला बी-टाऊनमधील नव्या स्टारचा उदय असे म्हटले आहे. हा चित्रपट अक्षय कुमारचा नाही, तर वीर पहाडियाचा असायला हवा होता, असेही एकाने म्हटले आहे. वीर पहाडिया याने याआधी ‘भेडिया’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन केले होते. यासह तो
दरम्यान, ‘स्काय फोर्स’ चित्रपटात अक्षय कुमार, वीर पहाडिया सोबत सारा अली खान आणि निम्रत कौर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी दिग्दर्शित हा चित्रपट हवाईदलात सेवा देताना पुरुष आणि महिला जवानांनी गाजवलेल्या शौर्याचे प्रतिक आहे.
11 कोटींचा गल्ला
दरम्यान, ‘स्काय फोर्स’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. विकेंडला यात आणखी वाढ होईल अशी आशा आहे.