वसंत प्रभू जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम

संगीतकार वसंत प्रभू यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘मानसीचा चित्रकार तो… वसंत प्रभू… एक संगीतमय अनुभूती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुजा क्रिएशन्स आयोजित हा कार्यक्रम 17 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता माटुंगा येथील जयंत आणि जयश्री साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, यशवंत नाटय़ संकुल येथे होणार आहे.

या कार्यक्रमात विद्या करलगीकर, तनुजा फाटक, शिल्पा पटवर्धन, दीप वझे, किरण चिटणीस, रुद्र चिटणीस हे कलाकार कला सादर करणार आहेत. ध्वनी संयोजक विराज भोसले हे असतील. अधिक माहितीसाठी संपर्क हेमेंद्र गोगटे 9892198710.