जागेच्या वादातून नायगावमध्ये गोळीबार, सात जण जखमी

नायगावच्या बापाणे परिसरात जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या गोळीबारात हाऊसिंग एल.एल.पी. ग्रुपचे सदस्य संजय जोशी, अनिश सिंग, शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, वैकुंठ पांडे, सचिन राठोड, राजन सिंग हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी गोळीबार करणाऱया मेघराज भोईर याला ताब्यात घेतले आहे. बापाणे येथील मौजे चंद्रपाडा परिसरात असलेल्या जागेव रून हाऊसिंग एल.एल.पी ग्रुप आणि भोईर कुटुंबीयांचा वाद सुरू होता.