
कांगा क्रिकेट सामन्यामध्ये शंभर बळी आणि एक हजार धावा करणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुरेश देवभक्त यांचे आज वयाच्या 83व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबई रणजीसह अनेक सामन्यांमध्ये आपल्या घणाघाती फलंदाजीने चमकदार कामगिरी करणारा खेळाडू काळाच्या पडद्याआड गेला आहे. वसईचे नाव क्रिकेटच्या जगात प्रसिद्ध करणारे सुरेश देवभक्त हे दोदू या टोपण नावाने ओळखले जायचे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात भाचा कवीश कत्रे हा आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून क्रिकेट खेळणारे देवभक्त यांनी 1971 साली अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन ऐतिहासिक पराक्रम केले आहेत. मुंबईतील मैदानांवर त्यांनी आपल्या खेळाची झलक किव्रेटपेमींना दाखवली. त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.