1 कोटी सॅलरीनंतरही इंजिनीअर मेहनत करत नाहीत

हिंदुस्थानातील अभियंते हे एक कोटी रुपयांच्या सॅलरीनंतरही कठोर मेहनत करत नाहीत, असे वादग्रस्त विधान अमेरिकी टेक कंपनी गीगा एमएलचे सीईओ वरुण वुम्मदी यांनी केले आहे. वुम्मदी यांनी सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करून हिंदुस्थानातील इंजिनीअरच्या कामांविषयी चिंता व्यक्त केली आहे. हिंदुस्थानातील इंजिनीअर यांना वार्षिक एक कोटींच्या सॅलरीनंतरसुद्धा हे लोक मन लावून काम करायला तयार नाहीत, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. वरुण वुम्मदी यांनी आयआयटी खडगपूर येथून शिक्षण घेतले आहे.

वेगवेगळय़ा प्रतिक्रिया

वरुण वुम्मदी यांच्या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळय़ा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आठवडय़ात पाच दिवस आणि दररोज आठ तास काम करणे हे मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा योग्य आहे, तर काही युजर्संनी लिहिले की, कोणी किती तास काम करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जास्त तास काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जाऊ नये