
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर तर लोटलाच, शिवाय मुंबईसह राज्यभरात दिवसभरात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले. यामध्ये गरजूंना मदत, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांचा गौरव, शैक्षणिक वस्तूंचे वाटप, आरोग्य शिबीर, स्पर्धा आणि गोरगरीबांना, गरजूंना मदत असे विविध उपक्रम राज्यभरात आयोजित करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मिळालेल्या मदतीमुळे आणि सामाजिक उपक्रमांमुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.
शाखा क्र. 220 च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. उपनेते राजकुमार बाफना, विभागप्रमुख संतोष शिंदे, दक्षिण मुंबई समन्वयक माई परब, मुंबादेवी विधानसभा संघटक राजू पह्डकर, मुंबादेवी समन्वयक सुनील कदम, उप विभागप्रमुख सुरेंद्र निगुडकर, सह समन्वयक अजय खानविलकर, रुपेश खांडके, संतोष घरत यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख वैभव मयेकर यांनी केले होते.
शिवसेना शाखा 191 च्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करताना माजी नगरसेविका विशाखा राऊत, शाखाप्रमुख अजित कदम आदी उपस्थित होते.
भायखळा विधानसभा लव्हलेन शाखेच्या वतीने शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांच्या हस्ते लाडूवाटप करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक मंगेश बनसोड, उपविभाग संघटिका सोनम जामसुतकर, सहसंघटक सूर्यकांत पाटील, शाखाप्रमुख सुहास भोसले, निंगाप्पा चलवादी, संध्या तळेकर, प्रमोद लाड, देविदास माडीये, बबन सकपाळ, श्रेयश पाटील आदी उपस्थित होते.
अॅकवर्थ लेप्रसी हॉस्पिटल येथे शीव विधानसभेच्या वतीने भोजन आणि शीव ग्राहक संरक्षण कक्षाकडून फळवाटप करण्यात आले. यावेळी विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, संघटक गजानन पाटील, विनायक तांडेल, शाखाप्रमुख सचिन खेडेकर, संजय कदम, सुशील सुंकी, महेश बिरवटकर, सचिन साठे, गणेश भोईर, शैलेश पाटील, प्रशांत भिसे, राजेश धामेजानी, शीव विधानसभेचे उपविभागप्रमुख राजेश कुचिक यावेळी उपस्थित होते.
शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना शाखा आणि खारमधील ओम भारत क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विधानसभा समन्वयक चंद्रशेखर वायंगणकर, हरी शास्त्राr, उपविभागप्रमुख उदय दळवी, उपविभागसंघटक अलका साटम, आयोजक वसंत गावडे, सुषमा गवस, संतोष चव्हाण उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्रमांक 193 च्या वतीने खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार आणि विभागप्रमुख महेश सावंत यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुख संजय भगत यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण केले. यावेळी लक्ष्मण भोसले, तारक राउल, रेखा देवकर, माजी नगरसेविका ज्योती भोसले, हिरु दास, कीर्ती मस्के, रत्नाकर चिरनेरकर, वैष्णवी फोडकर , अर्चना पाटील, प्रणिता पारकर, प्रगती वाघधरे, राखी किर, प्रल्हाद कोठेकर,अमर लब्दे, रवींद्र गजने, प्रकाश किर, दीपक जाधव, समीर भिडू, इंदुलकर, जंजीरकर, बाळा कांदळगावकर, उल्हास कदम, सुभाष सारंग, संजय चव्हाण उपस्थित होते.
अंधेरी पश्चिम विधानसभेतर्फे व लोटस आय हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते. यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, माजी आमदार अशोक जाधव, विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, समन्वयक सुनील खाबिया जैन, विधानसभा संघटक विना टॉक उपस्थित होते.
प्रबोधन कुर्ला शाळेमध्ये पावसाच्या पाण्याचे विद्यार्थिनींच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष
भाऊ कोरगांवकर, विश्वस्त शलाका कोरगांवकर, विद्या फलके, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिवसेना मागाठाणे शाखेच्या वतीने ‘आदिशक्ती महायज्ञा’चे आयोजन बोरिवलीत केले. यावेळी मागाठाणे विधानसभा प्रमुख अशोक म्हामुनकर, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, चेतन कदम, रोहिणी चौगुले, आयोजक शाखाप्रमुख अशोक परब व शाखा समन्वयक अमित मोरे उपस्थित होते.