हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23जानेवारी रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेना आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवासेना मुंबई समन्वयक अभिषेक पाताडे आणि शिवसेना शाखा क्रमांक 194 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’भगवा जल्लोष’ अंतर्गत आधार कार्ड अभियानाला शनिवारपासून प्रारंभ झाला. या उपक्रमाचे उद्घाटन विभागप्रमुख आमदार महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सुनील शिंदे यांनी देखील या कार्यक्रमाला भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक शिवसेना व युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिवसेना शाखा क्र. 6 च्या वतीने भव्य शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या हस्ते झाले. माजी विभागप्रमुख प्रकाश कारकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक हर्षद कारकर व उपविभाग संघटक, युवासेना कार्यकारिणी सदस्य दीक्षा कारकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास माजी आमदार विलास पोतनीस, उपविभागप्रमुख विनायक सामंतदेखील उपस्थित होते.
शिवसेना शाखा, शास्त्रीनगर व शहीद भगत सिंग मंडळाच्या वतीने आयोजित ‘फटकारे 2025’ ही चित्रकला स्पर्धा मोठय़ा उत्साहात पी. डी. पाटील उद्यानात झाली. चित्रकला स्पर्धेत सुमारे 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा प्रारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन पाटील यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे व ‘फटकारे’ या व्यंगचित्र संग्रहाचे पूजन करून करण्यात आले. तीन गटांत झालेल्या स्पर्धेत मोठय़ा गटातून ओजास काळूगडे, मध्यम गटातून आराध्या शिंदे व लहान गटातून शौर्य जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या वेळी कार्यक्रमाला कराड दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख गणेश शिंदे, जिल्हा संघटिका अनिता जाधव, तालुकाप्रमुख दिलीप यादव, संघटक अजित पुरोहित, नरेंद्र लोहार, उपतालुकाप्रमुख संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
जय भवानी प्रतिष्ठान, शिवसेना शाखा क्र 215 व युवासेना यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी 283 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना उपनेते व रत्नागिरी–सिंधुदुर्ग– कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, शाखाप्रमुख विजय पवार, युवासेना उपसचिव हेमंत दुधवडकर, शाखा संघटक सुप्रिया शेडेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेते अशोक धात्रक, विभागप्रमुख संतोष शिंदे, आशीष चेंबूरकर, माजी महापौर महादेव देवळे, विभाग संघटक युगंधरा साळेकर, दक्षिण मुंबई समन्वयक माई परब, मलबार हिल विधानसभा संघटक अरविंद बने, विकास मयेकर, विजय कामतेकर, सुजित राणे आदी उपस्थित होते.