
उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे एका 19 वर्षीय तरुणीवर सलग सात दिवस 23 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 23 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत त्यातील सहा जणांना अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, २९ माक्च रोजी सदर तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घऱी जायला निघाली होती. त्यावेळी रस्त्यात तिला राज विश्वकर्मा नावाचा तरुण भेटला. तो तिला तिथल्याच एका कॅफेत घेऊन गेला. त्यानंतर तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती एका घऱात होती व राजने तिच्यावर बलात्कार केला होता. दुसऱ्या दिवशी समीर नावाचा तरुण तिला जबरदस्ती स्वत:सोबत घेऊन गेला. तिथे त्याच्या पाच मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. यात सोहेल, दानिश, अनमोल, साजिद आणि झहीर अशी त्या पाच जणांची नावं आहेत. आरोपींनी तिला ड्रग्ज देऊन तिच्यावर आळीपाळीने वेगवेगळी लोकं बलात्कार करत होती. कधी तिला कुणाच्या घरी नेले जायचे, कधी तिला हॉटेलवर नेले जायचे, कधी कुणाच्या टेरेसवर तिच्यावर बलात्कार झाला. ड्रग्जच्या अमलामुळे ती कायम गुंगीत असायची.