वेंपिंगचं व्यसन पडलं महागात, महिलेच्या फुफ्फुसातून काढलं 2 लीटर विषारी द्रव

अमेरिकेत एका महिलेला वेपिंगचे व्यसन महागात पडले आहे. वेपिंगमुळे आरोग्याची गंभीर समस्या आली आणि त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही थक्क झाले.

द न्यूयॉर्क पोस्टनुसार, 32 वर्षीय जॉर्डन ब्रिएल ने 2021 मध्ये वेपिंग करायला सुरूवात केली होती आणि तिला त्याचे एकप्रकारे व्यसन लागले होते. ती वेपच्या उत्पादनांवर 500 डॉलरपर्यंत खर्च करायची. ती वेपिंगच्या इतकी आहारी गेली होती की, ती झोपताना आणि आंघोळ करताना वेपिंग करायची. याबाबत ब्रिएल सांगते की, तिच्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये. मी जिवंत आहे, त्यासाठी डॉक्टराचे आभार मानते. पुढे ती म्हणते की, तिची वेपिंग करण्याची सवय दोन वर्ष सुरुच होती आणि ब्रिएलला मागच्या नोव्हंबर मध्ये तिला तिच्या फुत्फुसांमध्ये जडपणा वाटू लागला. मात्र तरीही वेपिंग सुरूच राहिले.

आधी डॉक्टरांनी ते श्वसनाचा संसर्ग झाल्याचे सांगत तिला औषधे दिली. मात्र तिची अवस्था बिघडत होती. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. शिवाय तिचा खोकलाही वाढला. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिने रुग्णालयात धाव घेतली. ब्रिएलने आठवण करत सांगितले की, मला भयंकर खोकला झाला होता आणि त्यासाठी मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा रुग्णालयात जावे लागत होते. माझा आवाज घशातून निघेनासा झाला होता. दरवेळी ते मला घरी पाठवायचे. त्यावेळी छातीवर 80 पाऊंडचा दबाव पडल्यासारखे व्हायचे. माझ्या आयुष्यात एवढी आजारी मी कधीच पडले नव्हते.

मात्र एकदिवस माझी अवस्था गंभीर झाली. माझ्या नाकातोंडातून काळा द्रवपदार्थ येत होता. त्यावेळी माझ्या प्रियकराने मला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आणि माझ्यावर उपचार केले. डॉक्टरांनी माझ्या फुफ्फुसातून दोन लीटर काळे आणि रक्तासारखा द्रव पदार्थ काढला आणि त्यानंतर मला थोडे हलके वाटू लागलेय. त्यानंतर मी शहाणी झाले आणि लोकांना वेपिंग न करण्याचा सल्ला देऊ लागले.