तीन तासांत 36 बोगद्यांतून जाणार वंदे भारत

vande-bharat-express

जम्मूहून श्रीनगरला जाणारी वंदे भारत ट्रेन येत्या 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. जम्मू ते श्रीनगर अशा तीन तासांच्या प्रवासात वंदे भारत तब्बल 36 बोगद्यांतून जाईल. 272 किलोमीटरपैकी 119 किलोमीटरचा प्रवास हा बोगद्यातून जाणार आहे. ही ट्रेन उधमपूर-श्रीनगर बारामुल्ला रेल लिंकसह डोंगराळ भागातील बोगद्यांतून धावणार आहे. नव्या वंदे भारतमध्ये एकूण 530 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. ट्रेनमध्ये 1 एक्झिक्युटिव्ह क्लास, 7 एसी चेअर कार आणि एकूण 8 कोच असतील. ही ट्रेन एकूण 18 स्टेशनवरून जाईल. यामध्ये रियासी, बक्कल, दुग्गा, सावलकोटे, संगलदान, सुंबेर, खारी, बनीहाल, शाहाबाद हिल हॉल्ट, कांजीगुंड, सदुरा, अनंतनाग, बिजबेहरा, पंजगाम, अवंतीपोरा, रत्नीपोरा, काकापोरा, पंपोर स्टेशनचा समावेश आहे.

कोणत्या बोगद्यातून किती प्रवास

– बोगदा टी50 – संबर ते खाडी हा 12 किलोमीटरचा प्रवास बोगद्यातून जाईल.
– बोगदा टी80 – पीर पंजल मार्गावरील बनीहाल ते काझीगुंड हा 11.2 किलोमीटरचा प्रवास बोगद्यातून जाईल.
– बोगदा टी 34 – पाई खाड आणि अंजी खाड या मार्गावरील 5 किलोमीटरचा प्रवास बोगद्यातून जाईल.
– बोगदा टी33 – त्रिकुटा हिल्समधील बोगद्यातून 3.2 किलोमीटरचा प्रवास.
– बोगदा टी23 – 3.15 किलोमीटरचा प्रवास.
– बोगदा टी 25 – या बोगद्याला बनवण्यासाठी सहा वर्षे लागली. या बोगद्यातून 3 किलोमीटरचा प्रवास.
– ही ट्रेन थेट दिल्लीहून श्रीनगरला जाणार नाही. प्रकाशांना दिल्ली ते श्रीनगर अशी तिकिटे दिली जातील. परंतु, कटरा स्टेशनकर पोहोचल्यानंतर प्रकाशांना दुसरी गाडी बदलाकी लागेल.