नवी दिल्लीहून वाराणसीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सोमवारी उत्तर प्रदेशच्या इटावा स्थानकावर थांबली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही ट्रेन बराच वेळ थांबली. घटनेची माहिती मिळताच टेक्निकल टीम घटनास्थळी पोहोचली. खुप प्रयत्न करूनही जेव्हा वंदे भारत दुरुस्त नाही झाली तेव्हा मालगाडीचे इंजिन लावून ही वंदे भारत सुरु करण्यात आली.
वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसमधून 730 प्रवासी प्रवास करत होते. तेव्हा इटावा स्थानकावर सव्वा नऊच्या सुमारास इंजिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. इंजिनीअर्सनी खुप प्रयत्न केले पण ही गाडी सुरुच झाली नाही. प्रवाशांनीही यावरून खुप गोंधळ घातला. अखेर मालगाडीचे इंजिन वंदे भारतला जोडण्यात आले आणि ही ट्रेन भरथाना स्टेशनपर्यंत नेण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या वंदे भारत ट्रेनने प्रवाशांना वाराणसीपर्यंत नेण्यात आले.
BJP का इंजन FAIL हो गया
कांग्रेस का इंजन उसे खींच रहा है pic.twitter.com/MIyFASsLqa
— Congress (@INCIndia) September 9, 2024