आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱया व्यक्ती आणि संस्थांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे.
राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्यासाठी प्रभावीपणे काम करणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱया घटकांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.
आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱया एका स्वयंसेवी संस्थेला, उत्कृष्ट काम करणाऱया तीन डॉक्टरांना, उत्कृष्ट आरोग्य वार्तांकन करणाऱया एका पत्रकाराला व आरोग्य विभागात कार्यरत 5 कर्मचाऱयांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी 23 जानेवारी रोजी दरवर्षी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.