
क्रिकेटवेड्या हिंदुस्थानात इतर खेळांमध्ये प्राविण्य मिळवत आपल्या नावाचा डंका वाजवणारे काही मोजकेच खेळाडू देशामध्ये आहेत. या मोजक्या खेळाडूंमध्ये टीम इंडियाची स्टार हॉकीपटू वंदना कटारिया हिच्या नावाचा सुद्धा समावेश केला जातो. हिंदुस्थानी महिला हॉकीच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारी ती एकमेव खेळाडू आहे. 15 वर्ष दमदार खेळाचे प्रदर्शन केल्यानंतर तीने आता आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तीने यासंदर्भात माहिती दिली.
हरिद्वारच्या रोशनाबाद येथे राहणाऱ्या 32 वर्षीय वंदनाने गेली 15 वर्ष टीम इंडियाचे विविध स्पर्धांमध्ये नेतृत्व केले. आपल्या खेळाचा डंका वाजवला. 2009 मध्ये तिची वरिष्ठ संघात एन्ट्री झाली, त्यानंतर तीने मागे वळून पाहिले नाही. 2020 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानापर्यंत मजल माणाऱ्या टीम इंडियामध्ये वंदनाचा समावेश होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत हॅट्रीक मारत तीने इतिहास रचला होता. असा भीम पराक्रम करणारी ती पहिली आणि एकमेव हिंदुस्थानी खेळाडू आहे. त्यानंतरही विविध स्पर्धांमध्ये तीने आपल्या खेळाचा दर्जा दाखवून दिला आहे. फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या FIH प्रो लीगमध्ये तीने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.
View this post on Instagram