Prakash Ambedkar – छातीत दुूखू लागल्याने प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफीची शक्यता

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याने आंबेडकर यांना गुरुवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओग्राफी होणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. सध्या प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही अशी माहिती वंचितच्या प्रवक्त्यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीविषयी माहिती देण्यात आली आहे. छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने दिली आहे.

पुढील तीन ते चार दिवस प्रकाश आंबेडकर डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम व संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचितच्या प्रचाराचे नेतृत्व करतील, अशीही माहिती यात देण्यात आली असून प्रकाश आंबेडकर लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.