![valentines day](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/valentines-day-696x447.jpg)
उद्या जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल. परंतु, जगातील काही देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास मनाई आहे. जगातील पाच प्रमुख देशांचा समावेश असून यात सौदी अरब, पाकिस्तान, इंडोनेशिया, इराक आणि इराण या देशाचा समावेश आहे. सौदी अरबमध्ये व्हॅलेंटाईन डे वर पूर्णपणे बंदी आहे. पाकिस्तानात व्हॅलेंटाईन डेवरून वाद आहे, इंडोनेशियात एक दिवसांची बंदी आहे. तर इराक आणि इराण या ठिकाणी धार्मिक कारणांवरून बंदी घालण्यात आलेली आहे. येथील सरकार व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग आहे, असे मानते.