वडनेर पोलीस निरीक्षकाचे अकस्मात निधन

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेय. या निरीक्षकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने झोपेतच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मनोज वाढीवे असे मृत पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या निधनामुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.

वडनेर पोलीस स्टेशन येथे असलेल्या पोलीस निवासस्थानी कॉटर मधे पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे हे राहत होते. पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सकाळी वडनेर पोलीस स्टेशन च्या काही कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना फोन केला. अनेक फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारी पोलीस स्टेशनजवळ असलेल्या क्वार्टर मध्ये पोहचले, त्यांनी दारही ठोठावले पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दार तोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पोलीस निरीक्षक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं बोलल्या जात असताना देखील यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांना उधाण आले आहे. वडनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळूचा मोठा डेपो आहे. वणा नदी पात्रातून रेतिची मोठीं तस्करी केली जाते. मागील काही काळात हा रेती चोरीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पेटला होता यामुळे वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यावर मोठा दबाव होता. तर दुसरीकडे याच रेतीमापियांसोबत त्यांचे संबंध देखील असल्याचे काही लोक बोलत आहेत यामुळे आता ठाणेदार मनोज वाढीवे यांच्या निधनानंतर वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटले आहे.