आयफोन निर्माता कंपनी अॅपल मुंबई आणि पुण्यात 400 जागांची भरती करणार आहे. कंपनी बंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार ठिकाणी अॅपल स्टोअर ओपन करणार आहे. यासाठी कंपनीच्या वेबसाईट्सवर जॉब ओपनिंग दिसत आहेत. यात पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा दोन्ही जागा दिसत आहेत. सध्या अॅपलचे मुंबईतील बीकेसी आणि दिल्लीत असे दोन अॅपल स्टोअर आहेत, परंतु आगामी काळात आणखी अॅपल स्टोअर उघडण्याची तयारी कंपनीने केली आहे.