रेल्वे विभागात 1785 पदांवर भरती

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. रेल्वे विभागात 1 हजार 785 पदांसाठी भरती केली जात आहे. 28 नोव्हेंबर 2024 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 आहे. ही भरती दक्षिण पूर्व रेल्वेत शिकाऊ पदासाठी केली जात आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcser.co.in, iroams.com/RRCSER24/ वर उपलब्ध आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.