व्ही नारायणन यांची इस्रोच्या नवीन प्रमुखपदी नियुक्ती, एस सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारणार

v-narayanan-appointed-new-space-secretary

केंद्राने व्ही नारायणन यांची हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्थेचे नवे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. श्री नारायणन हे 14 जानेवारी रोजी संस्थेचे विद्यमान प्रमुख एस सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

मंगळवारी एका अधिसूचनेत, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने म्हटले की लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (LPSC), वालियामालाचे प्रमुख नारायणन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. नारायणन हे स्पेस कमिशनचे अध्यक्ष देखील असतील, त्यांनी हिंदुस्थानच्या क्रायोजेनिक इंजिनच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. या आधी हे तंत्रज्ञान देशाला नाकारण्यात आले होते.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार नवनियुक्त इस्रो प्रमुख म्हणाले, ‘आमच्याकडे हिंदुस्थानसाठी एक स्पष्ट रोडमॅप आहे आणि मला आशा आहे की आमच्याकडे प्रचंड प्रतिभा असल्याने इस्रोला अधिक उंचीवर नेले जाईल’.