ऋषिकेशमध्ये राफ्टिंग करताना बोट उलटली, एका पर्यटकाचा बुडून मृत्यू

उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगा नदीत राफ्टिंग करताना बोट उलटल्याने एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर नेगी असे मयत पर्यटकाचे नाव असून तो देहरादून येथील रहिवासी आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सागर नेगी हा मित्रांसोबत देहरादूनहून ऋषिकेशला बुधवारी राफ्टिंगसाठी आला होता. ऋषिकेशमधील शिवपुरी येथून सर्वांनी गंगा नदीत राफ्टिंगला सुरवात केली. मात्र गरुड छत्ती पुलाजवळ पोहचताच त्यांची बोट अचानक उलटली. यामुळे बोटीतील सर्वजण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागले.

राफ्टिंग गाईडने तत्परता दाखव सर्व पर्यटकांना एक-एक करून सुरक्षितपणे राफ्टवर परत बसवले. मात्र सागर नेगी बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ बाहेर काढत ऋषिकेश सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)