उत्तराखंडच्या गढवालमध्ये मुसळधार पावसाने थैमान

उत्तराखंडच्या गढवालमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले, पावसामुळे चारधामयात्रा थांबवण्यात आली. बद्रीनाथ-विष्णू प्रयाग राष्ट्रीय महामार्गाजवळ दरड कोसळल्याने रस्ता ठप्प झाला. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, जम्मू कश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे शनिवारी अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आलेल्या पुरात आतापर्यंत 114 वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. तर 95 प्राण्यांना वाचवण्यात यश आले आहे.