अनियंत्रित कार थेट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत

अनियंत्रित कार दरीत कोसळल्याने भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विनोद सिंह नेगी, चंपादेवी नेगी आणि गौरव नेगी अशी मयतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली.

नेगी कुटुंब दिल्लीहून पौडी जिल्ह्यात आपल्या मूळगावी चालले होते. यावेळी द्वारिखालजवळ त्यांची कार अचानक अनियंत्रित झाली आणि 300 मीटर खोल दरीत कोसळली. यात कारमधील आई-वडील आणि तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरफने टीमने घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. एसडीआरएफच्या टीमने रस्सी आणि स्ट्रेचरच्या मदतीने दरीतून तिन्ही मृतदेह बाहेर काढले.