यूपीमधील ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त, 10 कोटींचे ड्रग जप्त 

अवैधरीत्या सुरू असलेला उत्तर प्रदेशमधील ड्रगचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ड्रगप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करून मुंबईत आणले. अखिलेश प्रताप सिंग आणि मोहंमद गौस उैर्फ अहमद कुरेशी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्याच्याकडून दहा कोटींचे ड्रग जप्त केले आहे.

शहरात अवैधरीत्या ड्रग तस्करी करणाऱ्यावर पोलीस कारवाई करत असतात. गेल्या वर्षी साकीनाका पोलीस हे गस्त करत होते. गस्तीदरम्यान अमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या चौकशीत आणखी दोघांची नावे समोर आली. त्या दोघांनादेखील पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांच्या चौकशीत अखिलेशचे नाव समोर आले. ते  दोघे अखिलेशकडून ड्रग विकत घेत असायचे. त्यानंतर ते मुंबई आणि नवी मुंबईत वितरीत करत असायचे. मुंबई पोलिसांचे पथक उत्तर प्रदेश येथे गेले. एका गावात पोलिसांनी फिल्डिंग लावून सुरू असलेला ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांनी 5 किलो वजनाचा द्रव स्वरूपाचा मेफ्रेड्रॉन आणि 500 ग्रॅम एमडी पावडर असा 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.