विद्यार्थिंनींचा लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवायचा; निनावी पत्रामुळे वासनांध प्राध्यापकाची नीच कृत्य आली जगासमोर

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सेठ फूल चंद्र बागला कॉलेजमधील प्रोफेसर रजनीश याच्याविरोधात विद्यार्थीनींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका विद्यार्थीनीने महिला आयोगाला याबाबत पत्र लिहून तिच्या सोबत तसेच इतर विद्यार्थीनींसोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी रजनीश विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर कॉलेजने देखील रजनीशला निलंबीत केले आहे.

महिला आयोगाला मिळालेल्या पत्रात रजनीशवर तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. रजनीश विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे करायचा, त्यांचा लैंगिक अत्याचार करायचा तसेच यावेळी व्हिडीओही रेकॉर्ड करायचा. अनेक मुली बदनामी होऊ नये म्हणून त्याचा हा छळ सहन करत आहेत. मात्र या नराधम राक्षसाविरोधात कडक कारवाई करून मला व माझ्यासारख्या इतर पीडित मुलींना न्याय द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देतात. पण तरिही अशी लोकं मुलींवर असा अत्याचार करत आहेत. या व्यक्तीने मला इतका त्रास दिला आहे की मी आत्महत्या करायचा विचार करत होते, असे सदर विद्यार्थीनीने पत्रात म्हटले आहे. या विद्यार्थीनीने रजनीशचे विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करतानाचे काही फोटो व व्हिडीओही देखील महिला आयोगाला पाठवले आहेत.