उत्तर प्रदेशात एक भयंकर घटना समोर आली आहे. केवळ 30 रुपयांच्या वादातून सलून मालकाने तरुणावर कैचीने हल्ला केल्याची घटना लखनऊमध्ये घडली आहे. या हल्ल्यात तरुणाचे आतडे बाहेर आले आहे. हल्ल्यादरम्यान मदतीसाठी आलेल्या तरुणाच्या भावावरही न्हाव्याने वस्तऱ्याने हल्ला केला. जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आरडाओरडा ऐकून शेजारी गोळा झाले. शेजाऱ्यांना पाहून सलून मालक आणि त्याचा भाऊ घटनास्थळाहून पळून गेले. शेजाऱ्यांनी तरुणाला केजीएमयू ट्रामा रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.