भाजप नेत्याकडून पत्नी आणि मुलांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू; पत्नी अत्यवस्थ

भाजप नेत्याने पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली आहे. या गोळीबारात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नीची प्रकृती अत्यवस्थ असून तिला पोलीस संरक्षणात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी मुलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याला अटक केली आहे.

योगेश रोहिला असे आरोपी भाजप नेत्याचे नाव असून तो सहारनपूर जिल्हा भाजप कार्यकारिणीचा सदस्य आहे. दरम्यान, नेत्याने हा गोळीबार का केला याबाबत अद्याप खुलासा होऊ शकला नाही.

योगेश रोहिला या मानसिक आजार असल्याची माहिती मिळते. पत्नी आणि मुलांना गोळ्या घातल्यानंतर योगेशने स्वतः शेजाऱ्यांना याबाबत सांगितले. शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असता त्यांना धक्का बसला. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत योगेशला ताब्यात घेतले. गोळीबारात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी आहे. पोलीस योगेशची चौकशी करत आहेत.