शाहजहाँ गार्डनचे नाव बदलून अहिल्याबाई होळकर ठेवा, भाजप मंत्र्यांची मागणी

आग्र्यातील प्रसिद्ध शाहजहाँ गार्डनचे नाव बदलून राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर ठेवावे अशी मागणी उत्तर प्रदेशच्या महिला व बाल कल्याण मंत्री राणी मौर्य यांनी केली आहे. मौर्य यांनी या मागणीचे पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहे.

”मालवाच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी महिलांच्या विकासासाठी खूप काही केले आहे. आमच्या सरकारने देखील महिलांच्या विकासाला नेहमी प्राधान्य दिले आहे. ताजमहल व आग्र्याचा किल्ला यामध्ये असलेल्या शाहजहाँ गार्डनचे नाव बदलून जर अहिल्याबाळ होळकर ठेवले तर त्याने अनेक महिलांना प्रेरणा मिळेल. अशा प्रकारे नाव बदलण्यात काहीही चूक नाही, असे मौर्य म्हणाल्या.