कामगाराला मिळाली 1.92 कोटींची आयकर नोटीस

उत्तर प्रदेशमधील आयकर विभागाने रोजंदारीवर काम करणाऱया एका कामगाराला तब्बल 1.92 कोटी रुपयांची आयकर नोटीस पाठवली. हा तरुण व्यापाऱयाकडे कामाला होता. कामाला ठेवण्याआधी व्यापाऱयाने कामगाराचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड घेतले होते. या नोटिसीची माहिती कामगाराने मालकाला दिली. ‘‘तू घाबरू नको. मी काहीतरी करतो,’’ असे आश्वासन मालकाने दिले. परंतु दुसरी नोटीस मिळाल्यानंतर मालकाने कामगाराला शिवीगाळ करायला सुरुवात केली. फसवणूक करणाऱया मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगाराने केली आहे.