छुप्या कॅमेऱ्याने बनवले होते कपल्सचे व्हिडिओ, असं उघडकीस आलं संपूर्ण प्रकरण…

उत्तर प्रदेशात एक धक्कायदायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील औरैया जिल्ह्यात पोलिसांनी एका पिझ्झा हबला सील केलं आहे. पिझ्झा हबचे मालक हबच्या आतील केबिनमध्ये बसलेल्या मुला-मुलींचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करायचे, असा आरोप आहे. याप्रकरणी बिधुना कोतवाली पोलिसात तक्रार देण्यात आली.

पिझ्झा हबवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान केबिनमध्ये लहान छिद्रे दिसली, त्याद्वारे छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवले जात असल्याचे पोलिसांना दिसलं.

याबाबत माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला तक्रारीरचे पत्र मिळालं होतं. यात लिहिलं होतं की, अचलदा रोडवर झैका पिझ्झा हब आहे, ज्यामध्ये खाजगी केबिन बांधल्या आहेत. या केबिनमध्ये येणारी सर्व मुले-मुलींचे व्हिडिओ रेकॉडर करून ते व्हायरल केले जातात.

तक्रारीचे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिझ्झा हब सील केलं. पोलिसांनी येथून हसनैन आणि अयान नावाच्या दोघांना अटक केली. आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.