
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं गरजेचं होतं. सगळं महाराष्ट्र आस लावून बसलेला होता, परंतु या सरकारने निराशा केली. त्यावरती उद्या सभागृहात आवाज उठवणार, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर म्हणाले आहेत. अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.
उत्तम जानकर म्हणाले की, “लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची तरतूद करण्यात आली नाही.” ते म्हणाले, वीज, पाणी या सगळ्या गोष्टींमध्ये बोजवारा उडाला आहे. कर्जमाफी दिली असती तर, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता.”