स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतात आणि चष्म्याचा नंबर वाढतो. त्यामुळे मोबाईलवरच्या स्क्रीनवर बघण्यापेक्षा त्याच अॅक्टिव्हिटी डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा टीव्हीवर केल्यास डोळ्यांवर परिणाम होत नाही असा सल्ला नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला आहे.
सामनाशी बोलताना डॉ. लहाने म्हणाले की, मोबाईलमधून ब्ल्यु लाईटमुळे डोळ्यांना त्रास होतो. मोबाईलमध्ये असणारे व्हॉट्सअॅप आणि युट्युब जर लॅपटॉपवर वापरले तर डोळ्यांना त्रास होत नाही. मोबाईल आणि टॅबवरचा स्क्रीन टाईम कमी करावा. लॅपटॉप, डेस्कटॉप वापरताना प्रत्येक 20 मिनिटानंतर उजवीकडे डावीकडे भिंतीकडे पहावं. यासाठी 20-20-20 हा फॉर्म्युला वापरावा. 20 मिनिटानंतर 20 फुटांवर 20 सेकंदांसाठी पहावे. दोन तासांनी दोन मिनिटांसाठी डोळे बंद करावेत. तसेच लॅपटॉप आणि डेस्कटॉपची स्क्रीन सहा इंच खाली ठेवावी त्यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत. मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी केल्यावर चष्म्याचा नंबर वाढणार नाही असेही डॉ. लहाने म्हणाले
या लिंकवर जाऊन तुम्ही डॉ. तात्याराव लहाने यांची संपूर्ण मुलाखत पाहू शकता.