![gaza bombing israel palestine war](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/10/gaza-bombing-israel-palestine-war-696x447.jpg)
गाझापट्टी ताब्यात घेऊन तेथील पडक्या इमारती जमीनदोस्त करू आणि आर्थिक विकासाची पायाभरणी करू अशी घोषणा करून अरब राष्ट्रांना आव्हान देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता गाझा विकत घेणार असल्याचे म्हटले आहे. तेथील पुनर्विकासाची संपूर्ण जबाबदारी अमेरिका घेईल. इतकेच नाही तर, मध्य पूर्वेकडील देशांची जबाबदारीही अमेरिका घेऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. पॅलेस्टिनींना आता गाझापट्टीत परतण्याचा अधिकार नाही, असेही ट्रम्प म्हणाले.