हिंदुस्थानात मतदान वाढवण्यासाठी अमेरिकेकडूनचा 140 कोटी रुपयांचा निधी रद्द, एलन मस्क यांची माहिती

अमेरिकेकडून हिंदुस्थानला 140 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार होता. हा निधी हिंदुस्थानात मतदान वाढवण्यासाठी केला जाणार होता, पण हा निधी रद्द करण्यात आला असून अमेरिकेचे मंत्री एलन मस्क यांनी ही माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी अब्जाधीश एलन मस्क यांच्याकडे DOGE विभागाची जबाबदारी दिली आहे. अमेरिकतला निधी कुठे खर्च होतो याची देखरेख या विभागाकडे असते.

DOGE कडून एक ट्वीट करण्यात आले आहे. त्यात अमेरिकेच्या नागरिकांच्या कराचा पैसा कुठे खर्च होणार होता आणि तो निधी रद्द करण्या आल्याची माहिती देण्यात आली होती. यात बांगलादेशसाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी होता. बांगलादेशात राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी अमेरिका हा निधी देणार होती. तर दुसरीकडे हिंदुस्थानात मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी 21 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 180 कोटी रुपयांचा निधी देणार होते. पण हा निधी देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून अमेरिकेच्या जनतेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागाने म्हटले आहे.