मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा हिंदुस्थानच्या तावडीत, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची प्रत्यार्पणाला मंजुरी

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा याला लवकरच हिंदुस्थानच्या ताब्यात दिले जाणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने हिंदुस्थान-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच त्याला हिंदुस्थानात आणले जाणार आहे.

काय आहेत राणावर आरोप?

तहव्वूर राणाने हल्ल्यातील आणखी एक मास्टरमाइंड डेविड कोलमन हेडलीला मदत केली होती. या हल्ल्यासाठी राणाने मुंबईतील ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास एक वर्षानंतर तहव्वूर राणा याला अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने शिकागोमध्ये अटक केली होती.