Video रिले स्पर्धेत हातातील दांडका जिंकणाऱ्या मुलीच्या डोक्यात घातला, सहस्पर्धकाचे धक्कादायक कृत्य

स्पर्धा म्हटली की हार जीत होणारच. पण आपला पराभव समोर दिसल्यानंतर रिले स्पर्धेत एका तरुणीने चक्क तिच्या हातातील दांडका सहस्पर्धकाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील शाळेत घडली आहे.

वर्जिनिया शहरातील ब्रुकविल शाळेत आंतरशालेय रिले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 200 मीटरच्या स्पर्धेत चार चारचे असे चार ग्रृप धावत होते. त्याचवेळी केलेन टकर ही स्पर्धक नोरकॉम रनर हिला मागे टाकून तिच्या पुढे जात होती. ते पाहून रनर बिथरली व तिने तिच्या हातातील दांडका थेट टकरच्या डोक्यात मारला. याने टकर कळवली व जमिनीवर पडली. त्यानंतर रनर व तिच्या शाळेला या स्पर्धेतून बाद करण्यात आले.