ट्रम्प यांच्याकडून काश पटेल यांचे बॉलीवूड स्टाईल वेलकम

वॉशिंग्टन यानी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनियुक्त एफबीआय संचालक काश पटेल यांचे बॉलीवूड स्टाईल वेलकम केले. ट्रम्प यांनी ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातील मल्हारी या गाण्यावर काश पटेल हे नृत्य करतानाचा व्हीडियो एक्सवरून शेअर केला आहे. या व्हीडियोत काश पटेल यांचे मार्ंफग केले आहे. त्यामुळे जणू काही रणवीर सिंहच्या जागी तेच नाचत आहे असे या व्हीडियोत दिसत आहे. विजयाचा जल्लोष करणारे हे नृत्य आहे. त्यामुळे हा व्हीडियो ट्रम्प यांनी शेअर केला आहे. दरम्यान, एफबीआयचे नववे संचालक म्हणून माझी निवड केली. माझ्यावर विश्वास दाखवून पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अॅटर्नी जनरल बोंडी यांचे आभार अशी प्रतिक्रिया काश पटेल यांनी दिली आहे.