महागाई प्रचंड वाढली असून अन्नधान्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी पावले उचलणार तसेच अमेरिकेच्या इतिहासात कधी झाली नसेल इतकी मोठी करकपात करणार असल्याचे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. तसेच जी उत्पादने अमेरिकेत घेतली जाणार नाहीत त्या उत्पादनांवर कर लादणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीप्रसंगी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते.
तेलाच्या किमती कमी करा म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध ताबडतोब थांबेल, असे आवाहन ट्रम्प यांनी सौदी अरेबिया आणि ओपीईसी अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीजला केले. अमेरिकेत सुवर्णयुगाला सुरुवात झाली असून संपूर्ण देशात शांतता आणि समृद्धी नांदण्यास सुरुवात होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.