
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला कंपनीची कार खरेदी केली. ही कार लाल रंगाची असून टेस्ला मॉडल एक्सची कार आहे. या कारसाठी 80 हजार अमेरिकन डॉलर मोजले आहेत. ही कार निवडण्यासाठी खुद्द एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना मदत केलीय.
मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला पाठिंबा देण्यासाठी ही कार खरेदी करण्यात आली आहे. ड्रायव्हरच्या सीटवर बसताना ट्रम्प म्हणाले, ‘वाह, काय सुंदर कार आहे.’ यावेळी ट्रम्प यांच्यासोबत मस्क बसले. या कारचे वैशिष्ट म्हणजे ही कार अवघ्या काही सेकंदांत ताशी 95 किलोमीटरचा वेग पकडते. ट्रम्प यांना गाडी चालवण्याची परवानगी नसल्याने त्यांनी कारची टेस्ट ड्राइव्ह घेतली नाही, पण ते म्हणाले की, ही गाडी व्हाईट हाऊसमध्येच ठेवण्यात येईल, जेणेकरून त्यांचे कर्मचारी ती वापरू शकतील.