एलॉन मस्कला केले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, टाइम मॅगझिनचा खेळ; डोनाल्ड ट्रम्प भडकले

टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर उद्योगपती एलॉन मस्क यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या रूपात दाखवले. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भडकले. हे मॅगझिन अजूनही सुरू आहे का? असा संतप्त सवाल ट्रम्प यांनी केला.

टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर एलॉन मस्कचा फोटो आहे. मस्क हातात कॉफीचा कप घेऊन राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीत बसलेले दिसत आहेत. त्यांच्या मागे अमेरिका आणि राष्ट्राध्यक्षाचा ध्वज आहे. या फोटोबद्दल पत्रकारांनी विचारले असता ट्रम्प म्हणाले, टाइम मॅगझिन अजूनही सुरू आहे? मला काही माहिती नाही. टाईम मॅगझिनने शुक्रवारी मस्क यांच्यावर कव्हर स्टोरी केली.