US Plane Incident – अमेरिकेत दोन जेट विमानांची धडक, एकाचा मृत्यू; काही जण जखमी

अमेरिकेतील विमान दुर्घटनांचं सत्र थांबताना दिसत नाही. एरिजोना स्कॉट्सडेल विमानतळावर दोन जेट विमानांची धडक झाल्याने अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली.

बिझनेस जेट धावपट्टीवरून घसरले आणि एका खासगी जागेवर उभ्या असलेल्या बिझनेस जेटवर धडकल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्कॉट्सडेल विमानतळाच्या एव्हिएशन प्लॅनिंग आणि आउटरीच कोऑर्डिनेटर केली कुएस्टर यांनी सांगितले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, जे विमान पार्क केले होते ते पार्किंग क्षेत्रात होते.

स्कॉट्सडेल अग्निशमन विभागाचे कॅप्टन डेव्ह फोलिओ म्हणाले की, जखमींपैकी दोघांना ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले असून एकाची प्रकृती स्थिर आहे. स्कॉट्सडेल विमानतळावरील धावपट्टी बंद करण्यात आल्याचे कुएस्टर यांनी सांगितले. फिनिक्स परिसरातून ये-जा करणाऱ्या खाजगी विमानांसाठी हे विमानतळ एक महत्त्वाचे केंद्र आहे.